बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी पुरंदर
भोर : तालुक्यातील किकवी कडून कापूरहोळ मार्गे सासवड कडे जाणारी व्हॅगनार कार आणि सासवड कडून कापूरहोळ कडे निघालेला बारा चाकी ट्रक यांच्यात चिवेवाडी जवळील देवडी गावाजवळ सकाळी साडेआठ वाजता जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, धडक होताच कार थेट ट्रकच्या खाली गेली. यामध्ये कारच्या चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून, त्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. गणेश उर्फ बाळासाहेब शिवाजी लेकावळे वय 28 राहणार किकवी तालुका भोर आणि तृप्ती अक्षय जगताप वय 26 राहणार सुपे तालुका पुरंदर अशी या अपघातातील मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत .मयत तृप्ती यांचा दोन वर्षाचा मुलगा कृष्णा अक्षय जगताप मागच्या सीटवर फेकला गेला. त्यामुळे त्यास काही प्रमाणात दुखापत झाली. आणि सुदैवाने तो वाचला. याच्यासह प्रकाश बाबुराव दरेकर राहणार धावडी तालुका भोर हे जखमी झाले आहेत. याबाबत रोहिदास पांडुरंग ले कावळे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली .आली असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. माहेर होऊन जाताना तृपतीयावर काळाचा घाला. पोलिसांनी दिलेला माहितीनुसार मयत गणेश शिवाजी लेकावळे हे हडपसर येथील एका कंपनीत कामाला असून, नेहमीप्रमाणे ते त्यांची कारक्रमांक एम एच 14 डीटी 95 87 मधून सकाळी लवकर कामाला निघाले होते. मयत तृप्ती अक्षय जगताप त्यांच्या माहेरी येथे गेल्या होत्या. मयत लेकावळे यांच्या शेजारीच त्यांचे माहेर असून त्यांच्याच गाडीत बसून सासवड कडे निघाले होते .अपघाताचे वृत्त समजताच सासवडचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले .सासवड येथील ग्रामीण रुग्णालयत शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले .पुढील तपास सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव करीत आहेत.









