संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड तालुक्यातील देलवडी व एकेरीवाडी यात्रा उत्सव निर्विघ्न व शांततेत पार पडण्यासाठी यवत पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. पोलिस टाइमपास करायला येणार नाही. यात्रेत उपद्रव,विघातक कृत्य करण्यांची गय करणार नाही कोणी कितीही ताकद लावा कायदा मोडला की आम्ही गुन्हा दाखल करणार म्हणजे करणारच असा इशारा पोलिस उपनिरीक्षक आकाश शेळके यांनी दोन्ही गावात यात्रा कमिटीच्या बैठकीत दिला आहे.
तालुक्यातील देलवडी व एकेरीवाडी गावांचा यात्रा उत्सवास सोमवार दि.18 पासून सुरवात होत आहे. दरवर्षी प्रमाणे हजारो भावीक प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी देलवडी येथे येतात.यंदाही दोन्ही गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने धार्मीक व मनोरंजनासाठी सांस्कृतीक (तमाशा)कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.मात्र,यात्रेमध्ये काही टवाळखोरांकडुन उपद्रव केला जातो. देलवडी व एकेरीवाडी यात्रेत भांडणाचे प्रकार घडले आहेत.या पाश्वभुमीवर यवत पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक यांनी टवाळखोरांच्या विरुध्दात भुमिका स्पष्ट केली.
एकेरीवडी व देलवडी येथे यात्रा उत्सव नियोजनाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच यांच्या सह यात्रा कमिटी पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक आकाश शेळके म्हणाले,यात्रेत मोठया प्रमाणात गर्दी असते. चोरीचे प्रकार घडतात. महीलांनी मोल्यवान दागीन्यांवर लक्ष ठेवा.लहान मुलांवर लक्ष ठेवा. मंदीरात दर्शनाला जाताना घरी एखादा तरी व्यक्ती थांबा,पाळणे,तमाशा तसेच कुस्त्यांच्या आखाड्या दरम्यान भांडणाचे प्रकार घडणार नाही याची काळजी घ्य़ा. आवश्यक ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.शिवाय साध्या वेशात ही पोलिस फिरणार आहेत तसेच गावातील कॅमेऱ्यावर आमची नजर असणार आहे. तसेच यात्रेत गोंधळ,छेडछाड आदी अनुचित प्रकार करणाऱयांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या जाणार आहेत. यात्रेत तुम्ही मजा व उपद्रव करणार आणी पोलिस बघ्याची भुमिका घेणार हे कधीच होणार नाही.
कायदा मोडला की सोडणार नाही. कोणी कितीही ताकद लावली किंबहुना कोणी कोणास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तरी कारवाइ करणार म्हणजे करणारच आहे. टवाळखोरांना सळोकी पळोकी करुन सोडणार हे नक्की. या तंबीने टवाळखोरचे चांगलेच धाबे दणाणल आहेत


