बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली :राज्यात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत होणाऱ्या क्षेत्राचे पंचनामे करून अनुदान वाटत करण्या पर्यंतच्या प्रक्रियेचे शासनाने कार्य व जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहेत. असे असताना शासन निर्णयानुसार तलाठी यांच्याकडे असलेल्या याद्या तयार करून अनुदान वाटप करण्याचे काम तलाठी संघटनेने नाकारले आहे. त्या बाबतीत कृषी सहाय्यक संघटनेकडून वेगवेगळ्या शासन निर्णयाचा संदर्भ देत, सदरील काम हे तलाठी यांचेच असल्या बाबत शासनास कळविले आहे. आत्तापर्यंत महसूल यंत्रणाच अनुदान पात्र शेतकऱ्याच्या याद्या तयार करून अनुदान वाटव करत आलेली आहे. मात्र २०१४ मध्ये कृषी विभागाने वेगळ्या कळविलेल्या बाधीत क्षेत्राची अनुदान रक्कम कृषी विभागाकडे स्वतंत्रपणे देण्यात आल्यामुळे त्यावेळी कृषी विभागाने अनुदान वाटप करावे असे शासनाने आदेश दिले होते. व त्यानंतर वेळोवेळी प्रसिद्ध झालेले शासन परिपत्रक व शासन निर्णयामध्ये सदरील काम महसूल यंत्रणेनेच करावे असे निर्देश दिले आहेत.याद्या तयार करण्यासाठी लागणारी सर्व अचूक व दरवर्षी बदल होणारी माहिती ही केवळ तलाठी यांच्याकडेच उपलब्ध असते.तसेच त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र यंत्रनाही शासनाने पुरविल्याचे निवेदनात म्हटले आहे.शासनाच्या सर्व संबंधित निर्णयाचे अवलोकन करून या कामात निर्माण झालेला संभ्रम शासनानेच दुर करावा असे कृषी सहाय्यक संघटनेने निवेदनाद्वारे आव्हान केले आहे. निवेदन तहसीलदार नवनाय वगवाड यांच्यामार्फेत मुंख्यमंत्री , कृषीमंत्री , कृषी सचिव , जिल्हाधिकारी , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , उपविभागीय अधिकारी , तहसिलदार , तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आले. या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष संतोष वाघमारे , तालुका अध्यक्ष , रेखा पिंपरे , तालुका सचिव एस. एस . निमदेव , एस.डी. चिळकर , बालाजी पाटील गाडगे, पि. यु. बनसोडे , आर. एम . रनशुर , व्ही.एस. शिंदे, बि. यू. इंगोले , संदीप इंगळे, वाय. एम. चोपडे , एस. एम. कोटे , रवि इडोळे, पि.एस. व्यवहारे, जि.एस. वंजारे , एस . आर . राठोड , जि.डी. बर्गे , छाया ठोंबरे, संजिवनी शिदे, जंपनगिरे हे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)