अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि.15 डिसेंबर केज तालुक्यातील गांजी येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेत शिक्षणाच्या आईचा गो तर या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातच काय? गटशिक्षणाधिकारी साहेब चालले तरी काय? पवार गुरुजींना अभय कोणाचा हाय? एका महिला सहशिक्षिकावरच गांजी जिल्हा परिषद शाळेच्या चार वर्गाचा कारभार चालत आहे. एका कामचुकार गुरुजी मुळे चांगल्याप्रकारे काम करणाऱ्या शिक्षकांची समाजात बदनामी होत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, प्रशासनाने विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम करण्याकरिता शिक्षकांना लाखो रुपये पगार देऊन त्यांना नोकरीवर ठेवले असून जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम न करताच फुकट पगार उचलत आहेत.
असाच प्रकार केज तालुक्यातील साळेगाव केंद्रा अंतर्गत गांजी येथील जिल्हा परिषद शाळेत चालत आहे या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकूण चार वर्ग आहेत, इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या ३२ आहे या विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याकरिता दोन शिक्षकांची नेमणूक आहे.
या शाळेवर श्रीमती सिंधुताई शिवाजी मुंडे सहशिक्षिका व श्री दिनकर रामधन पवार सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
परंतु दिनकर पवार सहशिक्षक हे शाळेवर हजर राहत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे व त्यांचे भवितव्य अंधारातच राहत आहे.
श्रीमती सिंधुताई मुंडे सहशिक्षिका यांच्यावरच संपूर्ण शाळेचा पदभार आहे व त्या संपूर्ण ३२ विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम करत आहेत तसेच श्रीमती मुंडे मॅडम या गांजी येथील बी एलओ म्हणून काम करत आहेत.
दिनांक १३ जुलै २०२३ रोजी आणि दिनांक १० ऑक्टोंबर २०२३ रोजी गटशिक्षणाधिकारी केज यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव जाधव, सहशिक्षिका श्रीमती सिंधुताई मुंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गोविंद जगताप, सुनील जाधव, पालक समाधान बचुटे, किरण बचुटे, श्याम बचुटे, रोहित भांगे, सूर्यकांत जाधव, बालाजी जाधव यांनी लेखी निवेदन दिले आहे.
परंतु अद्यापही गटशिक्षणाधिकारी यांनी कसल्याच प्रकारची चौकशी अथवा कारवाई केली नाही त्यामुळे काम चुकार पवार गुरुजींना अभय मिळत आहे म्हणून ते शाळेवर सातत्याने गैरहजर राहत आहेत असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पालकांनी म्हटले आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व काही पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून आम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटलो तरी देखील आम्हाला अद्यापही न्याय मिळाला नाही असे शालेय समितीचे अध्यक्ष उद्धव जाधव यांनी सांगितले आहे .
दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव जाधव व शालेय समितीचे सदस्य यांच्यासह काही पालक शाळेत भेट देण्यात गेले असता शाळेमध्ये दिनकर पवार सहशिक्षक हे शाळेत हजर नाहीत असे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी अधिक चौकशी श्रीमती सिंधुताई मुंडे सहशिक्षिका यांना केली असता त्यांनी सांगितले की, पवार सर हे दिनांक ७ डिसेंबर रोजी शाळेत उपस्थित होते पवार सर हे दिनांक ८ डिसेंबर पासून शाळेवर येत नाहीत व ते कुठे गेले आहेत त्याची माहिती मला नाही व तसा त्यांचा शाळेमध्ये अर्ज देखील नाही.
परंतु पवार सरांनी दिनांक ७ डिसेंबर रोजी स्वतः शिक्षक हजेरीपटावर दिनांक ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर पर्यंतच्या सह्या करून गेले आहेत व त्यावर किरकोळ रजा असा उल्लेख केला आहे. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य व पालकांनी श्रीमती मुंडे मॅडम यांच्या समक्ष सर्वांनी श्री पवार सर शाळेत हजर नसल्याचा पंचनामा केला त्या पंचनामेवर सहशिक्षिका श्रीमती मुंडे मॅडम, शालेय समितीचे अध्यक्ष उद्धव जाधव, सुनील जाधव, समाधान बचुटे, रंजीत बचुटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चौकट:-
दिनकर पवार सर हे गेले अनेक दिवसापासून शाळेवर उपस्थित राहत नाहीत व विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत त्यासंबंधी मी व काही पालकांनी गटशिक्षणाधिकारी केज यांच्याकडे दोन वेळा लेखी तक्रार देऊन व वेळोवेळी त्यांना प्रत्यक्ष भेटून संबंधित शिक्षकांची तक्रार करून देखील ते या प्रकरणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाहीत त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य हे अंधारातच राहत आहे.
लवकरात लवकर गटशिक्षण अधिकारी साहेबांनी सदरील प्रकरणाची दखल घेतली नाही तर आम्ही ग्रामस्थ शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांची शाळा गटशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये भरवण्यात येईल.
शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उद्धव जाधव यांनी म्हटले आहे.








