सुदर्शन गावडे
तालुका प्रतिनिधि, पाटोदा
सहल सहल म्हटली की औत्सुक्याचा भाग आलाच.विद्यार्थीदशेत शालेय सहली आयुष्यभर आठवणीत राहणाऱ्या पर्यंटना बरोबर त्या माहितीपूर्ण आणि अभ्यासाचे भान राखले जावे या करिता सोदरा गुरूकुल डोमरी या शाळेची शैक्षणिक सहल चार गटात झाली . सहलीचे आयोजन कौतुकास्पद होते. वर्ग 5 वी 6 वी कोकण विभाग, 7वी 8वी पुणे तसेच थोडा वेगळा विचार करून वर्ग 9वी राजस्थान आणि वर्ग 10वी पंजाब असा गुरुकुलातील मुलांना वेगळा अनुभव व अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
शालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून शैक्षणिक सहलीकडे बघितले जाते.शैक्षणिक दृष्टींने महत्वाचे असणाऱ्या स्थळावर विद्यार्थ्यांना घेऊन जाने , परिवर्तन करणे हा अभ्यासाचा भाग असतो.विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पाडणे हा शैक्षणिक सहल काढण्यामागे संस्थेचा प्रामुख्याने उद्देश असतो. या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान , निरीक्षण , प्रयोग क्षमता आदींचा किमान विकास होईल असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.शैक्षणिक सहल म्हणजे विद्यार्थ्यांत आपलेपणा , नाते निर्माण होईल. अनौपचारिक शिक्षण सहलीतून जितके होते तीच सहल स्वावलंबनाचा गुंफण तयार करते.हा सकारात्मक उद्देश ठेवून सोनदरा गुरूकुलची शैक्षणिक सहलीतील वर्ग 10वी 3 डिसेंबरला पंजाबमधिल अमृतसर या ठिकाणी रवाना झाली. तसेच वर्ग 9 वी 7 डिसेंबरला राजस्थानला रवाना झाली या दोन सहली जाण्याअगोदर पाचवी सहावीचा गट व सातवी आठवी चा गट कोकण व पुणे हा भाग पाहून या दोन सहली गुरुकुलात परतल्या होत्या. राजस्थान व पंजाब या दोन्ही सहलीची मुलांची संख्या ५० होती तसेच कोकण व पुणे या गटाची संख्या 106 होती राजस्थान मधील मुलांनी अमेर किल्ला ,जयगड, हवा महाल, जंतर मंतर, बेयरफूट कॉलेज ,अल्बर्ट हॉल व इतर ठिकाणाचा अभ्यास केला तसेच पंजाब मधील मुलांना वेगवेगळे ठिकाण पाहत आली त्यामध्ये अमृतसर मधील सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग अटारी बॉर्डर, खालसा कॉलेज, वार म्युझियम, दुर्गाना मंदिर व उत्तर प्रदेशमधील महाराष्ट्राशी नाते असलेला आग्रा (ताजमहल ,आग्रा फोर्ट )असे वेगवेगळे ठिकाण मुलांना पाहण्यास मिळाली आणि मुलांनी या ठिकाणाचा इतिहासाला जोडून अभ्यास केला त्याचबरोबर या सर्व पाहिलेल्या गोष्टी केलेला अभ्यास शाळेत आल्यानंतर याचे प्रकटीकरण सर्व मुलांसमोर केले. या सर्व सहलीचे कौतुक समाजातून व पालक वर्गातून होत आहे.