भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
मराठवाडा व विदर्भातील अत्यंत सुपीक जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर व घरावर नागंर फीरु पाहणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला सर्व बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांन कडुन विजांच्या कडकडाटा प्रमाणे ज्यान देंगे पर जमीन नही देंगे. असा प्रखर विरोध असुन गेल्या अठरा दिवसांपासून साखळी उपोषण व दहा दिवस आमरण उपोषण सुरू होते. धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार भिमराव केराम यांच्या मध्यस्थीने भेट घेऊन. निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करा व पैनगंगा नदी पात्रात उच्च पातळी बंधारे बांधा अशी सविस्तर चर्चा केली असता उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकल्पा बाबतची सविस्तर माहिती घेऊन या प्रकल्पा बाबत पुन्हा एकदा आपण बैठक लावून सविस्तर चर्चा करु असे आश्वासन धरण विरोधी संघर्ष समितीला दिले व साखळी उपोषण मागे घेण्याबाबत सुचीत केले. उपमुख्यमंत्री साहेबांच्या बैठकीमध्ये धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप,समीतीचे प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव मुबारक तंवर कोषाध्यक्ष प्रल्हादराव गांवडे सर प्रल्हाद पेदोंर आदी सन्माननीय सदस्य उपस्थित होते.








