संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली
शालेय अभ्यासाबरोबर मैदानी खेळही खेळले पाहिजेत व यातूनच देशाचे भावी खेळाडू तयार होतील. आणि भविष्यात गावांसह देशाचे नाव रोशन करतील असे माजी जि.प.सदस्य संजय देसाई यानी सांगितले. ते कासार्डे केंद्रस्तरीय बाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जि.प. प्राथमिक शाळा कासार्डे बौद्धवाडी येथे बोलत होते.कासार्डे केंद्रस्तरीयबाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेचे उद्घाटन माजी जि. प.सदस्य संजय देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आली.यावेळी माजी सभापती प्रकाश पारकर ,ओझरम सरपंच समृद्धी राणे,उपसरपंच प्रशांत राणे,उपसरपंच गणेश पाताडे,माजी सरपंच संतोष पारकर ,शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते,भाऊ जाधव, सुधाकर राणे, उद्योजक प्रणिल शेटये, संचालक श्रीपत पाताडे, सोसायटी चेअरमन दिपक सावंत, पोलिस पाटील महेंद्र देवरुखकर, निळकंठ पाटील, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाताडे विजय राणे,अभिजित धुमाळ, श्वेता चव्हाण, निकीता ठाकुर,किशोर कुडतरकर, श्रीरंग पाताडे, श्रीराकुडतरकर ,नारायण घाडी, दिगंबर गुरव, आप्पा बोभाटा, विनायक जाधव, संतोष सावंत, रविंद्र जाधव,शिवराम पाताडे, राजकुमार पाताडे, उदय कदम इत्यादी मान्यवर सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,शिक्षक शिक्षिका पालक व विद्यार्थी उपस्थित होते. देसाई पुढे म्हणाले,आज जि.प.शाळेत पटसंख्या कमी होत असताना शिक्षकांचे कौतुक केले पाहिजे त्यानी या स्पर्धाचे आयोजन करीत योग्य नियोजन केल्यानेच आजच्या स्पर्धात्मक युगात अशाच स्पर्धाची आवश्यकता आहे असे सांगत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी भाऊ जाधव,संजय पवार, प्रकाश पारकर, सुहास पाताडे, कार्याध्यक्ष संजय पाताडे, श्रीराम कुडतरकर यांनीही मनोगत व्यक्त करीत क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करीत मान्यवरांच्या उपस्थित क्रिडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकिर शेख सर यांनी केले.