सचिन डोळे : तालुका प्रतिनिधी इंदापुर
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून राबवली जाणारी जलजीवन योजना कुंभारगाव मध्ये मंजूर झाली, सदर योजनेमार्फत एक कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी देखील मंजूर झाला , व त्यानंतर उघड सुरू झाला कंत्राटदारांचा एका पाठोपाठ एक दत्तक कंत्राट घेण्याचा प्रकार व त्या पाठोपाठ भ्रष्ट, दर्जाहीन काम उलघडले ते पाच ठिकाणी गळणाऱ्या पिण्याची पाण्याची टाकी , अगणित दररोज सुरू असलेले पाईपलाईनचे लिकेज , उघड्यावर केलेली पाईपलाईन व व सर्वात मुख्य म्हणजे आरोग्यास अपायकारक मैला मिश्रित खोदलेली पाण्याची विहीर.
जलजीवन योजना ही पुढील २५ ते ३० वर्षाचे नियोजन आखून दर्जेदार होणे आवश्यक असताना ,दर्जाहीन, लाव लजाव प्रकारचे काम केल्याने कंत्राटदार व तालुका पाणीपुरवठा कर्मचारी यांचा भ्रष्ट कारभार समोर आला व सर्व गावातील युवा वर्गाने संतप्त होऊन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या कार्यासमोर १४डिसेंबर २०२३ रोजी उपोषण सुरू केले. सदर युवकांच्या उपोषणाची श्री.रमेश चव्हाण,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी तातडीने दखल घेऊन तातडीने चौकशीचे लेखी आदेश देण्याचे आश्वासन दिले तसेच चौकशी संदर्भात लेखी पत्र उपोषणकर्ते श्री अरविंद वाघमारे, श्री स्वप्निल लोंढे , श्री रोहन लोंढे यांना उपोषण स्थळी देण्यात आले. सदर प्रसंगी उपोषणकर्ते श्री अरविंद वाघमारे यांनी चौकशी समितीच्या लेखी पत्रास अनुसरून उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले व तातडीने सदर चौकशी समितीने कुंभारगाव जलजीवन योजना इस्टिमेट, मेजरमेंट बुक, व प्रत्यक्ष ठिकाणी झालेले काम यांचा ताळमेळ पूर्णपणे दिशाहीन,विस्कळीत असल्याने, सदरचे काम कंत्राट दाराने व पाणीपुरवठा अधिकारी यांनी इस्टिमेट प्रमाणे दर्जेदार, पुढील वीस ते पंचवीस वर्षाचे नियोजन करून घेणे गरजेचे असल्याचे आवाहन केले, अन्यथा सदर योजनेचा उद्देश असफल होणार आहे. सदर योजनेची चौकशी होऊन, काम दर्जेदार न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे ठाकणार असल्याचे मनोगत श्री अरविंद वाघमारे यांनी व्यक्त केले








