अनिल वेटे
ग्रामीण प्रतिनिधी केळापूर
पांढरकवडा :- यवतमाळ जिल्हा पांढरकवडा तालुका ग्रामसेवक कर्मचारी यांच्या वतीने १४डिसेंबर२०२३ रोजी पासुन संप स्वीकारण्यात आला आहे.जुनी पेन्शन साठी राज्य सरकारच्या वतीने समिती स्थापन करण्यात आली. सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु विहित कालावधीमध्ये अहवाल सादर नाही झाल्यामुळे मुदत वाढ देण्यात आली.मात्र सदर समितीला तीन महिन्याची मुदत देऊनही समितीने अद्याप अहवाल जाहीर केलेला नाही. सदर बाबतीत शासन वेळ काढू पणाचे धोरण अवलंबित आहे. परिणामी जुन्या पेन्शन या प्रमुख मागणीचा अन्य मागण्यासाठी पांढरकवडा तालुका ग्रामसेवक कर्मचारी यांच्या वतीने १४ डिसेंबर २०२३ पासून संपाची हाक देण्यात आली आहे. न्यायिक मागणीसाठी संप व आंदोलनामध्ये ग्रामसेवक कर्मचारी यानी नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. तरी सर्व कर्मचारी सदस्य यांनी १४ डिसेंबर ग्रामसेवक कर्मचारी संपात सहभागी झाले. ही जुनी पेन्शन न्याय मागणी शासनापर्यंत पोहोचून संप व आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे.


