अमोल सावंत
तालुका प्रतिनीधी केज
दि.14 डिसेंबर सविस्तर व्रत्त असे केज,मस्साजोग,केळगांव,आरणगांव,काळेगांव घाट या मार्गे बस सेवा सुरू दि.14 डिसेंबर पासुन करण्यात आली आहे .नेहमीच समाज कार्यामध्ये ,जन सामान्यासांठी लढणारे व्यक्तीमत्व म्हणजे जेष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांच्या आथक प्रयत्नाने केज ते काळेगांव घाट ही बस सेवा सुरू करण्यात आली.ही बस सेवा सुरू केल्याबद्दल पंचकृषीतुन त्यांचे कौतुक/अभिनंदन होउ लागले आहे .मेन रोड बीड महामार्गावरून वाहन व्यवस्था वेळेवर होत नव्हती.प्रायव्हेट वाहन रिक्शा,जीप तासन तास भरती होइ पर्यंत गाडीत प्रवासी बसून राहयचे आणि वेळेत पोहचंण आशक्य होत असे याची केवीलवाणी मागणी काही ग्रामस्थांनी काकाजी कडे केली आणि त्या मागणीला प्रतिसाद देत बस सेवा सुरळीत चालु केली. काही शालेय विध्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मासन तास स्टॉप वर बसत असत शासकीय कामानिमित्त ग्रामस्त ,तरूणमंडळी जात असत त्यांचे हाल कमी झाल्यामुळे मुंदडा परीवाराला शुभेच्छा चा वर्षाव सर्व स्तरातुन होत आहे.पालक व विध्यार्थ्याच्या वतीने विशेषतः स्वागत होत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)