संतोष भरणे.
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर.
भारताचे माजी कृषिमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री हरणेश्वर विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन चित्र प्रदर्शन व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन कळसगावचे प्रतिष्ठित नागरिक श्री सुरेश खारतोडे यांच्या हस्ते करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनात एकूण सहभागी विद्यार्थी 79 होते. आधुनिकते कडे वाटचाल व नियंत्रण.या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण,प्रदूषण,सौर ऊर्जा,ठिबक सिंचन,पाणीबचत,स्वच्छता,शेती पर्यावरण या विषयावरती विद्यार्थ्यांनी सुंदर प्रकल्प केले होते.तसेच चित्र व रांगोळी प्रदर्शन दालनाचे उद्घाटन कळसगावच्या प्रतिष्ठित नागरिक सौ मोनिका कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले चित्र प्रदर्शनात 106 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर रांगोळी स्पर्धेत 79 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला चित्र व रांगोळी मधून समानता पर्यावरण, प्रदूषण,खेळ, सण उत्सव,महिला शक्ती असे विविध सामाजिक संदेश देणारे चित्र व रांगोळ्या होत्या,वरील कार्यक्रमास कळसगावचे प्रतिष्ठित नागरिक श्री दादा गावडे,बाबुराव गावडे,भाऊ खारतोडे,बापू खारतोडे,पोपट खटके,विशाल खारतोडे,रमण सांगळे,बापू बोंद्रे विद्यालयाचे प्राचार्य श्री पवळ आर.यु.पर्यवेक्षक श्री सोनवणे ए.एन.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कळस गावचे ग्रामस्थ प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व स्टाफ यांनी प्रदर्शनास भेट दिली.विद्यार्थ्यांचे उपक्रम सौ.मोनिका कांबळे यांना खूप आवडले त्यामुळे त्यांनी सर्व विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना कॅडबरी वाटप केली.या प्रदर्शनासाठी श्री घोळवे ए.यु.श्री.गावडे व्ही.टी.सौ.निंबाळकर व्ही.जे.श्रीमती कुटे.पी.एस.श्री.वायाळ जी.आर.श्री.चव्हाण आर.के.चित्रकला व रांगोळी प्रदर्शनासाठी करे पी.एल.निंबाळकर पी.एम.तर रांगोळी प्रदर्शनासाठी श्रीमती माने डी.बी.श्रीमती सातकर डी.बी.सौ.टकले एस.एस.सौ तांबोळी आर.एस.ओमासे वाय.एम.श्री.ओमासे एल.एल.गोळे बी.बी.शेख.ए.एच.वनवे जी.एस.खारतोडे बी.एम.यांनी वरील कार्यक्रमास मार्गदर्शन केले.


