हर घर जल ऐवजी जल मिशन योजनेला लागली घरघर
बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिगोली : वसमत तालुक्यातील कागबन येथे जल जीवन मिशनचे काम मंजुर झाले आहे. या मंजुर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत विहीरीचे काम कागदोपत्री गट नं. एक तर जलजीवनच्या नावाखाली विहीर झाली दुसऱ्या गटांमध्ये त्यामुळे जलजीवन मिशन योजनेची विहीर की खाजगी विहीर का जलजीवनची विहीर गेली चोरीला असा प्रश्न गावकर्यांना पडला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सह कागबन गावातील नागरीक वसमतच्या पाणी पुरवठा योजनेच्या कार्यालया समोर आमरण बसले आहेत. वसमत तालुक्यामध्ये ८० गावात जलजीवन मिशन योजनेची कामे चालू आहेत. पण सदरची कामे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची चालू असून या कामांना वरिष्ठ अधिकाऱ्या कडूनच मुकसंमती असल्याची खमंग चर्चा जिल्हात होत आहे. या कामाला वरिष्ठ अधिकार्या कडुन केवळ नावाला फोटोसेशन केल्या जाते, परंतु प्रत्यक्षात मात्र कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे कागबन गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदाम भालेराव यांनी बोगस कामाचे निवेदन प्रशासनाकडे देऊन कारवाईची मागणी केली. परंतु बोगस कामाकडे संबंधीत वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते. कागबन येथील जलजीवन मिशन योजना संशयामध्ये अडकल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय काकडे यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन सदरील प्रकरणाची शहानिशा करून जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली, उपजिल्हाधिकारी वसमत, गटविकास अधिकारी कार्यालय वसमत, जिल्हा अभियंता पाणीपुरवठा विभाग हिंगोली, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग वसमत आशा अनेक ठिकाणी निवेदन देऊन ११ . १२ 2023 पर्यंत संबंधीत कार्यालयाकडून संबंधीतावर कारवाईची मागणी केली होती. मागणी मान्य न केल्यामुळे संजय कवाडे, रविराज डोळसे, संघरत्न इंगोले हे दि १२ . १२ . 2023 यादिवसापासून ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कार्यालय वसमत येथे अमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा तिसरा दिवस होऊन गेला तरी अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकार्यांनी उपोषण कर्त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी आगामी ३५ वर्षाचा काळातील विचार करून प्रत्येक घरातील व्यक्तीचा विचार करून हर घर जल चा नारा देत घोषणा केलेली जलजीवन मिशन योजना कुचकामी ठरून जनतेच्या फायद्याची ठरते, की अधिकारी व गुत्तेदाराच्या फायदयाची ठरते याची खमंग चर्चा हिंगोली जिल्हामध्ये पाहायला मिळत आहे. उपोषस्थळी सचिन दगडू , मोहसीन शेख , सय्यद नयुम , धम्मपाल काळ , व समस्त गावकरी मंडळीची उपस्थिती होती.