सुधीर जाधव.
जिल्हा प्रतिनिधी, सातारा.
सातारा : निसराळे येथील उरमोडी नदीची ओटी भरण करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांचा सत्कार करताना उपस्थित सर्व ग्रामस्थ व शेतकरी वर्ग. सातारा तालुक्यातील निसराळे सह पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव पाठीशी उभे असणारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांचा उरमोडी नदीच्या पुलावर असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित येथोचित सन्मान करत नागरी सत्कार करण्यात आला. दरम्यान शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळख असणारे राजू शेळके यांनी कृष्णा व उरमोडी नदीत शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जिहे- कठापूर येथे आंदोलन यशस्वी करत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केल्याने निसराळे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी सत्कार करत राजू शेळके ‘तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत सर्व ग्रामस्थांनी साथ देण्याचे अभिवचन दिले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना राजेश शेळके म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या भावना लक्षात घेता माझ्या जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असून यापुढेही शेतकरी हितासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजू शेळके यांनी दिली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी इतर कोणीही अन्यायाच्या विरोधात वाचा फोडत नसल्याची खंत व्यक्त करून राजू शेळके यांनी शासन पातळीवर अभ्यास करून व योग्य मांडणी केल्यामुळे आपल्या हक्काचे चोरी होणारे पाणी हे आंदोलन करून मिळवले आहे. शेतकऱ्यांची एकजूट अशीच ठेवून आपल्या शेतकरी वर्गावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढा दिला पाहिजे असे सांगून राजू शेळके यांचे आभार मानले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष अर्जुन साळुंखे, माथाडी कामगार नेते संजय निकम, मनोहर येवले, जनार्दन आवारे, हणमंत शेडगे, मोहनराव जाधव, दीपक सावंत, अनिल काटे, रणजीत शेडगे, हर्षल निकम, सरपंच कुंदन शिंदे, महेश कदम, प्रवीण जाधव, राजू घाडगे, उमेश घाडगे, गजानन देशमुख, मधुकर खुळे- देशमुख, अजित देशमुख, प्रसन्ना मूल्या, नितीन काळंगे, संदीप काळंगे, प्रवीण काळंगे, संजय कांबळे, दादासो काटकर, अमोल जगताप, शिवाजी जाधव, काशिनाथ साळुंखे, असंख्य निसराळे पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी खराडे यांनी केले. तर आभार बाळासाहेब घोरपडे यांनी मानले.