विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८४ वा वाढदिवस इंदापूर तालुक्यातील डिकसळ जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी शालेय मुलांना शाळेचे मुख्याध्यापक तथा इंदापूर तालुका शिक्षक सोसायटीचे संचालक सतीश दराडे यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या कार्याचा आढावा सांगितला. तर प्रास्ताविकामध्ये इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांनी सांगितले की,शरद पवार यांचे शिक्षण काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतून सुरू झाले होते त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी शरद पवार सारखे मोठे विचार मनाशी बाळगून आपली शैक्षणिक प्रगती करावे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झाकणे उपस्थित होते शाळेच्या सहशिक्षिका वाघ मॅडम यांनी आभार मानले.