गजानन वानोळे
ग्रामीण प्रतिनिधी किनवट
किनवट तालुक्यातील अनुदानित आश्रम शाळा मुळझरा येथे बोगसरित्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन अनुदान उचलले जात आहे अशी तक्रार विद्यार्थाचे पालक रामदास रुख्माजी नखाते यांनी मा. प्रकल्प अधिकारी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट येथे केली आहे.
रामदास नखाते यांचा मुलगा समर्थ रामदास नखाते हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासमेट येथे चालू शैक्षणीक वर्षात वर्ग 3 री मध्ये शिकत असून , या मुलाचे युडाईस पोर्टल अद्यावत नसल्याने संबधित विद्यार्थाला व पालकाला फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शुभ संदेश शिक्षण प्रसारक मंडळ देगलुर संचालित अनुदानीत आश्रम शाळा मुळझरा या शाळेत अवैध रित्या बोगस प्रवेश करून युडाईस पोर्टल तयार करून अनुदान मिळवत आहे. समर्थ रामदास नखाते हा विद्यार्थी वर्ग पाचवी मध्ये अनुदानित आश्रम शाळेत शिक्षण घेत आहे वयात न बसता पाचवी वर्गात प्रवेश दिला आहे सदर प्रकरणाची चौकशी करून संबधीत मुख्याद्यापक व संस्थाचालक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याती यावी असे निवेदन रामदास नखाते यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्याकडे दिले आहे.









