प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१२ ऑगस्ट आज तहसील कार्यालय पाथरी येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस महिला यांनी धरणे आंदोलन केले आहे. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन हिमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा महत्त्वाचा घटक आहे. कृती समितीने निश्चित केलेल्या दि.४ डिसेंबर २०२३ असून बेमुदत संपात परभणी जिल्ह्यातील आयटक युनियनच्या सेविका व मदतीस सहभागी होत आहेत. शासनाने फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या संपत कृती समितीला मासिक पेन्शन, नवीन मोबाईल अंगणवाडी भाड्याचा प्रश्न व अन्य प्रश्न बाबत ठोस कार्यवाही करण्याचे सांगितले होते. त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी संप मागे घेतला. या बाबीला नऊ महिने झाल्यानंतर ही शासन दरबारी कोणतीच तोच कार्यवाही झालेली नाही. संप मागे घेतल्यानंतरही आयटक व कृती समितीच्या वतीने अनेक निवेदने वरिष्ठ पातळीवर गेली गेली. परंतु फक्त तोंडी आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडले नाही. मा. उच्च न्यायालयाचा आदेश होऊनही शासनच ते आदेश पायदळी तुडवीत आहे. तरी जिल्ह्यातील युनियनच्या सर्व सदस्या ऑनलाईन कामावर बहिष्कार घालत असून माहे नोव्हेंबर चा एम पी आर वर बहिष्कार टाकून न्याय मागण्यासाठी दिनांक ४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपात सहभागी झालेले आहेत. यावेळी बोलताना आंदोलकांनी सांगितले आहे जर लवकरात लवकर वरील सांगितल्याप्रमाणे मागण्या मान्य नाही झाल्या तर अजून तीव्र आंदोलन केल्या जाईल असे यावेळी बोलताना आंदोलक अँड कॉ. माधुरी क्षीरसागर व सुनिता धनले यांनी सांगितले.









