संजय भोसले.
तालुका प्रतिनिधी , कणकवली.
विद्यामंदिर प्राथमिक विभागामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थांना इंग्लिश भाषेचा सखोल अभ्यास होण्यासाठी बालपणा पासून इंग्लिश उच्चारशास्राचा परिचय झाला तरच भाषेची आवड निर्माण होईल या उद्देशाने प्राथमिक विभाग मराठी माध्यमामध्ये इंग्लिश भाषेतील शब्दांचेउच्चार या विषयी सुंदर असे मार्गदर्शन आदरणीय पौर्णिमा गांधी मॅडम यांनी केले . बालमनावर इंग्लिश भाषेची अभिरुची निर्माण करण्याचा अनोखा प्रयोग यशस्वी केला . इयत्ता पहिलीचे सत्तर विद्यार्थी या प्रशिक्षणाला उपस्थित होते . इंग्लिश भाषेतील निखळ शब्दकळा सौ . गांधी मॅडम यानी विद्यार्था समोर सहज सोप्या भाषेत मांडणी करून भाषेची गोडी उत्पन्न केली. वाचन क्षमता विकसित होण्यासाठी असे प्रशिक्षण उपयुक्त असते . असे प्रतिमादन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी व्यक्त करून प्रोत्साहन दिले . पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम इंग्रजी अध्यापक श्री ठाकूर सर वर्ग शिक्षिका सौ .खुडकर मुख्याध्यापिका सौ करंबेळकर मॅडम ‘ सौ .लोकरे मॅडम उपस्थित होते . प्राथमिक विभागातील विद्यार्थ्याच्या विकासासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ सौ साळुंखे मॅडम सचिक श्री वळंजू साहेब अध्यक्ष श्री तवटे साहेब तसेच सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते .
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)