अमृत कारंडे
तालुका प्रतिनिधी, जामखेड
कर्जत जिल्हा अहमदनगर नियोजित एमआयडीसी बाबत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने उद्योग मंत्री नामदार श्री उदय सामंत साहेब यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली. बैठकीमध्ये निर्णय झाला की पाटेगाव ग्रामपंचायतीने विरोध केला असल्याने त्याचबरोबर देशाला फसवलेल्या निरव मोदींची जमीन असल्यामुळे सदरील प्रस्ताविक एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. असून कर्जत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी उद्योगधंदे आले पाहिजेत त्या दृष्टिकोनातुन उद्योग मंत्री नामदार उदय सामंत साहेब यांनी कर्जत तालुक्यातील इतर जमीन नियम अटी व शर्ती पूर्ण करणारी एमआयडीसी साठी लागणारी जमीनीचा परीपूर्ण प्रस्ताव पंधरा दिवसाच्या आत सादर करून शासनाला सादर करावा असे स्पष्ट निर्देश दिले.