बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी, पुरंदर (सासवड)
पुरंदर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असून मंगळवारी दि.( 12) केंद्रीय दुष्काळ पथकाने तालुक्यातील शिवरी, तक्रारवाडी, साकुर्डे आणि नाझरे धरणाची प्रत्यक्ष पाहणे केली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या. राज्य सरकारने राज्यातील 42 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून, त्यांची अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला होता .या अहवालाची दखल गेत केंद्रातून 12 जणांची दुष्काळ पथके आली आहेत. त्यापैकी तीन पतके पुणे ,सोलापूर जिल्ह्यात माहिती घेत आहेत.. एका पथकाने मंगळवारी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली .या पथकातील अन्नपुरवठा विभागाच्या सरोजिनी रावत ,पाणीपुरवठा विभागाचे ए.ए. मुरलीधरन यांनी शिवरी येथील दुष्काळ आणि ज्वारी पिकाचे झालेले नुकसान तक्रारवाडी येथील रब्बीचे पीक साकुर्डे येथे फळबागा पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेले टँकर आणि नाझरे धरणावरील पाण्याच्या स्थितीची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी प्रांताधिकारी वर्षा लांडगे ,तहसीलदार विक्रम राजपूत, कृषी अधिकारी सुरत जाधव, गट विकास अधिकारी अमिता पवार ,जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले नाझरे प्रकल्पाचे अनिल घोडके आदी उपस्थित होते .पुरंदर तालुक्याची दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे .नाझरे धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला असून, त्यात काळाचे प्रमाण अधिक असल्याचे केंद्रीय पथकातील मुरलीधरन यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ होणार आहे असेही त्यांनी सांगितले.










