पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
खिंडसी तलाव रामटेक येथे रविवार, १० डिसेंबर रोजी द्वितीय “ओपन वॉटर स्विमिंग” स्पर्धेचे उद्घाटन रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरीत करण्यात आले.
यावेळी रामटेकचे डीवायएसपी आशित कांबळे, पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव, शाहीर राजेंद्र बावनकुळे, हिवरा बाजारच्या सरपंच रत्नकला जयस्वाल,सामाजिक कार्यकर्ते राजेश जयस्वाल, पी. टी. रघुवंशी, ऋषी किंमतकर, जयप्रकाश दुबळे, भोसले, दुरुगकर, फालके, अतुल चौकसे, गौरीशंकर सिंग, संजय चौकसे, प्रभाकर साठे, राजकमल बोटींग सेंटर रामटेकचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, सुष्टी सोंदर्य परिवार रामटेकचे सर्व पदाधिकारी, चेरी फार्मचे सर्व सदस्य, उज्ज्वल स्पोर्टसचे सर्व सदस्य, नागपूर जिल्हा हौसी जलतरण संघटनेचे सर्व पदाधिकारी, जेडी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू व स्पर्धक उपस्थित होते.


