मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी : प्रेम हा शब्द पूर्ण करण्यासाठी गोकुळातील गौळणीना आपले संपूर्ण अस्तित्व देवांच्या पायावर समर्पित करावे लागले. देवाकडे सुद्धा सर्व गोष्टी आहेत पण त्यालाही भक्तांच्या प्रेमाची भूक आणि प्रेमाचा दुष्काळ आहे म्हणून देव भक्तांकडून प्रेम घेतो .’ थोर प्रेमाचा भुकेला हाचि दुष्काळ तयाला ‘ या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगावर विश्लेषण करताना वारकरी अन संत जगाला प्रेमाचा संदेश देतात असा हितोपदेश प्रवचनकार हभप धनराज महाराज नागापुरे यांनी केला.
तालुक्यातील मुरखळा( माल ) येथील विठ्ठल आश्रमात सोमवारी ११ डिसेंबर रोजी वारकरी संप्रदाय मंडळ व वारकरी साहित्य परिषद जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व वारकरी साहित्य परिषद वर्धापनदिन आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्रवचन देतांना बोलत होते.
श्री विठ्ठल आश्रम येथून सकाळी संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा असलेली पालखी काढण्यात आली.पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी व भाविक ज्ञानबा तुकारामचा जयघोष करीत गावातील मुख्य मार्गावरून पालखी वाजत गाजत टाळ मृदुंग हाती घेऊन मुखी हरिनाम घेत असलेल्या या पालखीचे गावातील शेकडो भाविकांनी दर्शन घेतले.
यावेळी वारकरी मंडळाचे माया लाड , प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर , सिद्धर्थ पापडकर स्पंदन फाऊंडेशनचे डॉ. मिलिंद नरोटे , माजी जि.प.सदस्य सपनील वरघंटे ,पुष्पा नागापुरे , भैय्याजी बट्टे , बोंडकु बुरे , प्रकाश तुंबडे,जणार्धन तुंबडे बंडु गव्हारे, मुरलीधर मंगर , विद्या देशमुख , संगीता डांगे , वैशाली बोदलकार , सुचिता डांगे , योगी लाड ,खुशाली नागापुरे , जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रकांत वेटे , लोकमान्य विद्यालयातील शिक्षक मोहनदास चहारे , प्रकाश घोगरे , जयप्रकाश बुरांडे , कृपाचार्य कावटवार , कुमोद बुरे , मदन चावरे , आकाश गेडाम , पद्माकर राजूरवार ,रोशन नैताम ,पत्रू कुथे ,दिलीप चौधरी ,उमाजी पाल ,लहुजी रोहनकार ,राजू मानपल्लीवार ,मुन्ना मडावी ,अतुल वाकुडकर , मारोती कुथे ,प्रभाकर लोंडे ,बालाजी जराते ,रघुनाथ कोहपरे ,पुंडलिक मिसार , ढिवरू बोदलकार ,महादेव देवताळे ,मनोहर सातपुते ,हरिदास पोटे ,आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की भक्तांच्या प्रेमापोटी देवाने भिल्ल समाजात जन्माला आलेल्या म्हाताऱ्या शबरीची उष्टी बोर खाल्ली तर आपला दरिद्री मित्र सुदामाचे कोरडे पोहे खाल्ले म्हणून आपण सुध्दा जात व धर्म न पाहता अध्यात्मामध्ये एकमेकांवर प्रेम करा सांगत शेवटी महाराजांनी साने गुरुजींनी सांगितलेला ‘ खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे असे नमूद केले .
बॉक्स : माणूस म्हणून जगण्याची ताकद संत विचरातच : प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर
महाराष्ट्र भूमी ही संतांची म्हणून ओळखल्या जाते अनेक संतांनी समाज जागृती करण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्या संतांच्या विचारावर आज आपण वाडचाल करीत असून माणूस म्हणून आजही त्यांच्या विचारांची गरज असल्याचे पटवून देताना त्यानी दाखले व उदाहरण देऊन उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले
बॉक्स : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने अनेक समाजउपयोगी कार्यक्रम राबवित असतात त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना पेन , बुक शैक्षणिक साहित्य २० विद्यार्थ्यांना दिले व त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न करून इतरांना व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेतली . यात अक्षरा बुरे ,तनवी लाड ,निधी तुंबडे ,शर्वरी पोरटे ,ओमी मेश्राम ,श्रावणी तुंबडे ,चांदणी पोरटे ,मानवी पोरटे ,गुंजन सोमनकार ,वंशीका तुंबडे ,ओमीता गेडेकर ,भूमिका बुरे ,सलोनी बुरे ,माही मंगर ,आराध्या शेट्टे ,रोहन देशमुख ,अर्थ बुरे ,संकेत राऊत ,हर्षल निशाने ,वेदांत जांपलवार ,अनिकेत सातपुते ,श्रीकृष्ण बुरे ,यश बट्टे ,संयचीत बुरे ,चेतन बुरे , सागर बुरे ,कृष्णा बट्टे ,संस्कृत बुरे ,सुमित बोबाटे ,वॊमिद बुरे ,पार्थ बुरे ,श्रेयस मिसार ,अथांग गटलेवार ,यश पोटे यांचा समावेश आहे.