शिवमहापुराण कथेचे आयोजन
सर्व संतन स्मृतिदिन सोहळा
शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट- अकोट तालुक्यातील बोर्डी येथील ब वर्ग तीर्थक्षेत्र संत श्री नागास्वामी महाराज पुण्यतिथी बर्शी महोत्सव व सर्व संतन स्मृतीदिन सोहळा, सोमवार दि. 18-12- 2023 ला संपन्न होणार आहे. त्यानिमित्त शिवमहापुराण कथा सप्ताह(संगीतमय)चे आयोजन करण्यात आले. सोमवार दि.11-12-2023 ला तीर्थ स्थापना होऊन सप्ताहास प्रारंभ होईल.सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम 5 ते 6 सामुदायीक ध्यान व काकडा,रामधून दुपारी 1 ते 4 शिवमहापुराण कथा,सायं.5.30 ते 6.30 हरिपाठ व 7 ते 8 सामुदायीक प्रार्थना व रात्री8.30 ते 10.30 हरिकीर्तन होईल.या सप्ताहातील दैनंदिन कीर्तनकार सोमवार दि. 11,12,2023 ला ह.भ.प.संतोष महाराज ठाकरे (वाशिम) मंगळवार दि.12,12,2023 ह.भ.प.पंकज महाराज पवार (आळंदी देवाची) बुधवार दि.13,12,2023 ह.भ.प.पद्माकर महाराज देशमुख (अमरावती) गुरुवार दि.14,12,2023 ह.भ.प.वीठ्ठल महाराज जाधव (आळंदी देवाची शुक्रवार दि.15,12,2023 ह.भ.प.उमेश महाराज दशरथे (आळंदी देवाची) शनीवार दि.16,12,2023 ह.भ.प.लखनजी महाराज जामनेर (जळगाव खा.) रविवार दि.17,12,2023 ह.भ.प.राजेंद्र महाराज वक्टे,(पाळोदी,अकोला) हे राहतील.तसेच गायनाचार्य ह.भ.प.संतोष महाराज ठाकरे,ह.भ.प.उमेश महाराज रावणकर (हरताळा)
मृदंगाचार्य ह.भ.प.योगेश महाराज बोर्डीकर,
टाळकरी मंडळी,-बोर्डी शिवपुर रामापुर,सुकळी, मक्रमपुर, लाळेगाव,माऊली जीतापूर येथील वारकरी राहतील. तसेच सोमवार दिनांक 18,12,2023 ला सकाळी 7 वा. दिंडी सोहळा व श्री नागास्वामी महाराजांचे पादुकांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येईल,त्यानंतर कोंडीराम महाराज बोर्डीकर यांचे काल्याचे किर्तन होऊन भव्य महाप्रसादाला सुरुवात होईल.या कार्यक्रमाला श्री गुरुदेव सेवा मंडळ,समस्थ भजनी मंडळ,हरीपाठ मंडळ,श्री गुरुदेव विद्या मंदिर,जि.प. व.प्रा मराठी आदर्श शाळा,श्री नागास्वामी इंग्लिश स्कूल,नागास्वामी ग्रुप,शिवकृवंत ग्रुप,नवयुवक ग्रुप,एकता ग्रुप,सुर्योदय परिवार,जय भारत प्रतिष्ठान,महाकाल ग्रुप,मरीमाता ग्रुप,शिवप्रेमी ग्रुप,योगिनी प्रतिष्ठान,नागास्वामी उपहार गृह,ओम शांती साउंड सिस्टीम बोर्डी व प्रशांत साऊंड सर्विस अकोलखेड यांचे सहकार्य लाभणार आहे.या भागवत सप्ताहाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नागास्वामी महाराज संस्थान,अध्यक्ष,संचालक मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे


