कैलास शेंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरद
बोरद: बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जी प सदस्य तथा जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा सुनीता भरत पवार यांच्या अध्यक्षतेखाली जन आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत आरोग्य केंद्राला आलेल्या निधीचा वापर औषध मागवणे,कम्प्युटर दुरुस्ती करणे, पाणीपुरवठा, व स्वच्छतेसाठी खर्च करणे,परिसर स्वच्छ ठेवणे, रुग्णांना नियमित सेवा देण्यासाठी निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली व खर्च विषयावर चर्चा करून त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली.यावेळी डॉ. अरुण लांडगे यांनी मागील जमा खर्च वाचून दाखविला . मागील प्रोसिडिंग वाचून मंजूर करण्यात आली. यावेळी बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पियुषा धनगर ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, पंचायत समिती उपसभापती विजयसिंह राजपूत, सदस्य चंदन पवार व बोरद ग्रामपंचायत सरपंच अनिता भिलाव मोड सरपंच डॉ. पुंडलिक राजपूत रवींद्र भिलाव, भरत पवार, संजय पाटील सह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचारी उपस्थित होते.









