प्रमोद डफळ
शहर प्रतिनिधी राहुरी
राहुरी: राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची अहमदनगर नियंत्रण कक्षात तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करण्यात आली. राहुरी तालूक्यातील उंबरे येथे दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची चौकशी चौकशी प्रक्रिया करावयाची असल्याने पोलीस निरीक्षक जाधव यांची तात्पुरते स्वरुपात अहमदनगर नियंत्रण कक्षात नेमणूक करण्यात आली.
अहमदनगर येथील सायबर क्राईम मध्ये कार्यरत असलेले संजय सोनवणे यांच्याकडे सध्या राहुरी पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला. त्यांची नेमणूक ही सध्यातरी तात्पूरत्या स्वरुपात करण्यात आली आहे. भविष्यात ते येथेच कायम होणार कि पून्हा त्यांची बदली होऊन राहुरी पोलिस ठाण्यात पून्हा पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हे येणार. हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
सध्यातरी पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांनी राहुरी पोलिस ठाण्याचा पदभार घेतला असून अनेक जणांकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करताना दिसत आहे. काही वर्षापासून राहुरी तालूका गुन्हेगारांचे आगार बनला आहे. तालूक्यातील जातीयवाद, वाळू तस्करी, चोऱ्या, घरफोड्या आदि घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हे तालूक्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यात यशस्वी होत असतानाच त्यांचा राजकिय बळी जावून त्यांची अहमदनगर येथे नियुक्ती करण्यात आली. राहुरी पोलिस ठाण्यात नव्यानेच हजर झालेले पोलिस निरीक्षक संजय सोनवणे हे तालूक्यातील गुन्हेगारीवर कशा प्रकारे आळा घालणार. याची प्रतीक्षा तालूक्यातील जनतेला लागली आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षापासून राहुरी पोलिस ठाण्यात अधिकारी टिकत नाही. कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरच त्यांची बदली होत आहे. मात्र नव्याने आलेले पोलिस निरीक्षक संजय सोनवणे हे आपला कार्यकाळ पूर्ण करणार का? या बाबत तालूक्यात चर्चा सुरू आहे.