मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे :विविध मागण्यांसाठी तहसीलमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस ७ डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. यापैकी चांदूर रेल्वे तहसीलमधील 104 अंगणवाड्या बंद पडल्याने तेथे शिकणारी मुले शिक्षण व पोषण आहारापासून वंचित आहेत. राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिल्या जाणाऱ्या मानधनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मानधन वाढीच्या मागणीसाठी चांदूर रेल्वे तहसीलच्या 103 अंगणवाडी सेविका आणि 91 मदतनीस संपावर आहेत. त्यामुळे तहसीलमधील 104 अंगणवाड्यांना कुलूप लटकले आहे. अंगणवाडी सेविकांची सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी याशिवाय किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये करावे, पेन्शन लागू करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाइल फोन उपलब्ध करून द्यावेत अशा अनेक मागण्या घेऊन अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. वारंवार मागणी करूनही शासनाने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या संदर्भात अंगणवाडी सेविकांनी चांदूर रेल्वेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाचा (आयसीडीएस) दरवाजा ठोठावून आपल्या मागण्यांचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा व्यवहारे यांना दिले.
6 अंगणवाड्या सुरू झाल्या
चांदूर रेल्वे तहसीलमधील 97 अंगणवाडी सेविका व मदतनीस पैकी 91 या संपावर गेल्या आहेत, मात्र 6 मदतनीसच्या नवीन नियुक्तीमुळे त्यांना संपात सहभागी होता आले नाही. त्यामुळे 6 अंगणवाडी केंद्र मदतनीसाच्या भरोशावर सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.









