उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी
तळोदा: तालुक्यातील मेंढवड येथे एकाचा शेकोटीत पडून जळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की तळोदा तालुक्यातील मेंढवड शिवारात धैर्य कन्स्ट्रक्शन कंपनी च्या डांबर प्लान्ट च्या ऑफिस समोरील मोकळ्या जागेत शेकोटी पेटवून बसलेला वसंत साकऱ्या पाडवी वय – ६० रा सोमावल खुर्द
याचा दिनांक १०डिसेंबर २०२३च्या दुपारी ३ ते ११ डिसेंबर २०२३ च्या सकाळी ११ च्या काळात शेकोटीच्या मध्यभागी आगीत पडून त्यात चेहऱ्यापासून पायापर्यंत चा भाग जळाल्याने जळून मृत्यू झाला आहे याबाबत भतीबाई वसंत पाडवी वय – ५८ रा सोमावल यांच्या खबरी वरून तळोदा पो स्टे ला अकस्मात मृत्यू ची नोंद रजि क्र ४७/२०२३सी आर पी सि १७४ प्रमाणे घेण्यात आली असून पुढील तपास पो नि राहुलकुमार पवार करीत आहेत दरम्यान मयताचे शव विच्छेदन घटनास्थळी जागेवरच तळोदा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ कैलास ठाकरे यांनी केले असून श्वान पथक व फॉरेन्सिक तज्ञांना सुद्धा पुढील तपासासाठी पाचारण करण्यात आले होते शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)