अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
तलासरी तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून पंचायत समिती याठिकाणी बेधडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये या सर्व अंगणवाडी कर्मचारी कडून एकच मागणी करण्यात आली प्रशासनाने आम्हाला आमच्या कामाचा मानधन नको तर आम्हाला वेतन द्यावे अशी घोषणाबाजी देत तलासरीच्या मेन नाकाच्या ब्रिज पासून ते थेट तलासरी पंचायत समितीच्या कार्यालयापर्यंत बेधडक मोर्चा काढण्यात आला, एकीकडे प्रशासनाकडून मोठमोठ्या कंपनींना कोट्यावधी कर्ज माफ केला जातो मात्र प्रशासनाला आम्ही करत असलेल्या कामाचा मोबदलाही वेतन म्हणून देता येत नाही ही लाजिरवाणाची गोष्ट आहे असं सांगत शासनाने आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला लवकर च्या लवकरात मानधन नको तर वेतन दिलं पाहिजे अशी मागणी करताना दिसून आल्या, जोपर्यंत शासन आम्हाला वेतन देण्याची कबुली देत नाही तोपर्यंत आम्ही अंगणवाड्या बंद ठेवून संप करत राहणार असा इसारा तलासरी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सेविका ताई आणि मदतनीस ताई यावेळी माहिती दिलेली आहे.









