बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिगोली : रब्बी हंगाम सन 2023 24 मध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी ७० हजार २०६ मे टन रसायनिक खतांची मागणी करण्यात आली होती .त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाने हिंगोली जिल्ह्यासाठी 43 हजार मे टन रासायनिक खतांची आवंटन मंजूर केली आहे .रासायनिक खतांच्या एकूण मंजूर अवंटना पैकी रब्बी हंगाम २०२३ -२४ मध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी १२ हजार 270 मे.टन युरिया खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असुन चालू हंगामात आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात ७ हजार 234 म्हणजे ६० टक्के मे टन युरिया खताचा पुरवठा झालेला आहे .सध्यास्थितीत पीओएसवरील ऑनलाइन युरिया खताचा सुमारे ३ हजार मे टन शिल्लक साठा हिंगोली जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे दिसून येते.हिंगोली जिल्ह्यात आरसीएफ 1289 मे टन व आयपीएल 130 मे टन असा एकूण 1418 मे टन युरिया हिंगोली जिल्ह्यात प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यासाठी २२० मे टन , वसमत 341 मे टन ,हिंगोली साठी 331 मे टन, कळमनुरी साठी 316 मे टन व सेनगाव तालुक्यासाठी 210 मे टन याप्रमाणे तालुका निहाय प्राप्त झालेल्या युरिया खताचा तपशील प्राप्त झाला आहे.या व्यतिरिक्त आयएफएफसीओ कंपनीच्या नॅनो युरिया मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे.शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर करण्याचे आवाहन यापूर्वी अनेक वेळा कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. मागील काही दिवसांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा रब्बी ज्वारी व गहू या पिकांच्या पेरणीस वेग आला आहे.तसेच ऊस पिकासाठी युरिया खताची आवश्यकता असल्यामुळे सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात युरिया खताची मागणी करीत आहेत.बाजारात युरिया खताची व न्यानो युरियाची आवश्यकता त्या प्रमाणात उपलब्धता असताना रासायनिक खत विक्रेते शेतकऱ्यांना जास्त दराने युरिया खताची विक्री करीत असल्याच्या बातम्या वर्तमान वर्तमानपत्रातून येत आहेत.त्यामुळे रासायनिक खत विक्रेत्यांनी एमआरपी दरानेच शेतकऱ्यांना युरिया खताची विक्री करावी.तसेच युरिया सोबत इतर कोणत्याही अनावश्यक कृषी उत्पादनाची खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी आव्हान मोहीम अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली जे. एस. सोनटक्के यांनी केली आहे .









