राजपाल बनसोड
ग्रामीण प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस ; दिग्रस तालुक्यातील सर्कल मधील मोठे गाव म्हणून कलगाव ची ओळख आहे. परंतु येथील नागरिक मात्र त्रस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे सविस्तर वृत्त असेही वाड नंबर तीन मधील मागील पाच सहा महिन्यापासून सरपंच सचिव ग्रामपंचायत सदस्य यांना वेळोवेळी सांगूनही रस्त्याची दुरुस्ती होत नाही. या रदारीच्या रस्त्यावर नेहमीच नालीचे घाण पाणी साचून मोठे डबके राहते. येण्या जाण्याकरिता नागरिकांना हाच रस्ता असल्याकारणाने या घाण पाण्यातूनच जावे लागत आहे. नागरिकांच्या सांगण्यावरून असे लक्षात आले की या वार्डावरच ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करत असल्याचे बोलल्या जात आहे. शाळेतील विद्यार्थी ,वयस्कर नागरिकांना ह्या रस्त्याच्या घाण पाण्यातूनच यावे लागत आहे आपल्या आरोग्यावरही काही परिणाम होणार का अशी भीती वाटत आहे. आमच्या या रस्त्याची दुरुस्ती किंवा बांधकाम करून द्यावे व रस्त्यावर गिट्टी मुरूम टाकून देण्यात यावी अशी मागणी वार्डातील चेतन आव्हाड, चरण पवार, राजू दिवाने, शिव पवार, वसिमुद्दीन ,गजानन निखाडे, दयाशंकर ढाकुलकर ,चंद्रकला निखाडे,सावित्रीबाई पवार, जमीरुद्दीन, इत्यादी नागरिक करीत आहेत