संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
कळस -पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धा वर्ष 2023-24 वयोगट 14,17 व 19 वर्षे मुले व मुली विविध क्रीडा स्पर्धा इंदापूर तालुका गट पातळीवर श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी येथे दिनांक 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर कालावधी मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.सदर स्पर्धांचे उद्घाटन कार्यक्रमासाठी केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी शाळेचे. मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक तसेच डाळज,कळस ,काटी , खडकी शाळांचे क्रीडा शिक्षक व सर्व खेळाडू उपस्थित होते या विविध स्पर्धांमध्ये श्री हरणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळस च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन दमदार कामगिरी केली स्पर्धाचे निकाल पुढीलप्रमाणे.19 वर्षे मुले हॉली बॉल प्रथम क्रमांक,14 वर्षे मुले कबड्डी प्रथम क्रमांक मिळवून संघाना विजेते पद मिळविले, तसेच कुस्ती या खेळ प्रकारामध्ये अमर बगाडे, ओम खारतोडे श,पवन पवार,तेजस खरतोडे,धम्मसागर कांबळे,पवन खारतोडे हे सहा विद्यार्थी व श्रावणी चौगुले ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने विजयी होऊन या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.विद्यार्थ्यांना कुस्ती प्रशिक्षण वस्ताद हनुमंत पवार हे मार्गदर्शन करतात.मैदानी स्पर्धा 14 वर्षे मुले 400 मी व 600 मी मध्ये आदित्य कांबळे प्रथम क्रमांक,लांब उडी ज्ञानेश मेरगळ द्वितीय क्रमांक,17 वर्षे लांब उडी अथर्व खारतोडे प्रथम क्रमांक,19 वर्षे 100 मी यशराज गायकवाड प्रथम क्रमांक 400 मी साहिल माने प्रथम क्रमांक 800 मी साहिल गायकवाड प्रथम क्रमांक 1500 मी यशराज गायकवाड प्रथम क्रमांक,लांब उडी साहिल गायकवाड प्रथम क्रमांक,थाळी फेक ओंकार गायकवाड प्रथम क्रमांक,गोळा फेक रूपक सांगळे प्रथम ,ऋतुराज गायकवाड द्वितीय क्रमांक पटकावला.विविध खेळ प्रकारामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन उत्तम प्रकारे यश मिळवले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक गणेश वायाळ सर गिरीश वणवे सर,प्रविण निंबाळकर सर,परबती करे सर,भानुदास गोळे सर दादाराम जाधव सर,विद्यार्थी यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक रामचंद्र पवळ व पर्यवेक्षक अंकुश सोनवणे तसेच समस्त ग्रामस्थ कळस यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धे करीता शुभेच्छा देण्यात आल्या.अशी माहिती कळस विद्यालयाचे शिक्षक गणेश वायाळ सर यांनी दिली.


