बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी,पुरंदर
( सासवड) राज्याच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2023 पुरवणी अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पुरंदर तालुक्यात तील ग्रामीण भागातील रस्त्यासाठी 10 कोटी 30 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती ,भाजपा तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांनी दिली .या कामासाठी पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभा प्रभारी जालिंदर भाऊ कामठे, पुरंदर निवडूनुक प्रमुख बाबाराजे जाधवराव, मा. आ. अशोकराव टेकवडे यांनी पाठपुरावा केला होता .मंजूर झालेली विकास कामे एक कोंढवा सासवड वीर रस्ता रा.ना 101 साखळी क्रमांक 48/150 पूर्णगंगा ओढ्या लगेच संरक्षक भिंत बांधणे व परिसर सुशोभीकरण करणे तीन कोटी दोन रा.ना 132 ते तांदळे वस्ती समोर बाग मांगिरबाबा ते रा.ना 131 पर्यंतचा रस्ता ग्रा. मा.351 व किलोमीटर 0/00 ते 02/200 पर्यंतचा रस्ता करणे..रक्कम 3 कोटी, 2) शिवरी ते तक्रारवाडी ग्रा. मा.१६७ किलोमीटर 0/00 ते 2/00 रस्ता सुधारणा करणे.. रक्कम 2कोटी, 3) वीर ते संमगीर वाडी ग्रा. मा.216 किलोमीटर 0/500 ते 2/100 रस्ता सुधारणा करणे,रक्कम 1.7,4)रा. मा.132 ते सोनारबाग ते मागितबुवा रा. मा.131 ते ग्रा.मा.351 पर्यंत चा रस्ता,रक्कम 3 कोटी रुपये एकूण 10 कोटी 30 लक्ष निधी पुरंदर साठी मंजूर झाल्याची माहिती भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश जगताप यांनी प्रतिनिधीला माहिती दिली