बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी ,पुरंदर
सासवड : पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टी कार्याध्यक्षपदी सासवड येथील अभ्यासू व समाजसेवी व्यक्तीत्व मा.मयूर राजेंद्र भाऊ जगताप यांची निवड करण्यात आली .सदर निवडीचे पत्र पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष निलेश जगताप यांनी मयूर जगताप यांना निवडीचे पत्र दिले. पुरंदर हवेली भाजपा विधानसभा मतदारसंघाचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जाधवराव ,जालिंदर कामठे ,अशोक टेकवडे, राहुल शेवाळे ,पंडित मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने राहून भाजपाची ध्येय, धोरणे, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून तसेच माझे वडील आर. एन. भाऊ यांची सासवड नगरपालिकेवर भाजपा चा झेंडा फडकवण्याचे स्वप्नपूर्ती साठी प्रयत्न करणार आहे.पुरंदर तालुक्यात शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे आणणार असल्याची, निवडीनंतर मयूर राजेंद्र जगताप यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.









