मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदूर रेल्वे :तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे जी प शाळेच्या क्रीडा संकुल मध्ये मंजूर झालेल्या वर्ग खोल्यांची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अमरावती बुद्धभूषण सोनवणे आमला येथील केंद्रप्रमुख भूषण ठाकूर हेआलेअसतानाशिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी पाहणी करून आपल्या कर्तव्यावर अमरावती येथे गेल्यानंतर केंद्रप्रमुख भूषण ठाकूर व गावातील काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी अमला येथे बियरबारवर जाऊन राजकीय प्रतिनिधी सोबत पार्टी केली.
सदर केंद्रप्रमुख पाहणी करून झाल्यानंतर आमला विश्वेश्वर येथील बियर बारवर गेल्याची माहिती पंचायत समिती माजी उपसभापती तथा सदस्य प्रतिभा डांगे यांना माहिती मिळतात त्यांनी बिअर बार गाठून केंद्रप्रमुख भूषण ठाकूर व राजकीय पक्षाचे तीन प्रतिनिधी यांच्या पार्टीमध्ये जाऊन व्हिडिओ काढून व्हायरल केला. व त्यांनी शिक्षणाधिकारी अमरावती गट शिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांना माहिती दिली. सदर कर्मचारी कर्तव्यावर असताना बार वर कसा असे प्रश्न निर्माण होत असून या कर्मचाऱ्यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे तालुक्याचे लक्ष ला
संदीपबोडखेप्रभारीगटशिक्षणाधिकारी
सदर व्हिडिओ सोशल मीडिया माध्यमाद्वारे समजला यावर वरिष्ठ कडून आदेश आल्यावर योग्यती कार्रवाही करून चौकशी अहवाल पाठवण्यात येईलप्रतिभा डांगे सदस्य पंचायत समिती आमला ( विश्वसर)
आज प्राथमिक शिक्षणाधिकारी अमरावती अधिकारी केंद्र प्रमुख भूषण ठाकूर हे नवीन वर्ग खोल्याच्या जागेची पाहणी करण्या करीता आले असता पाहणी करून गेल्यावर केंद्र प्रमुख काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्यासोबत कर्तव्यावर असताना आमला विश्वेश्वर येथील बार मध्ये आढळले यावर योग्य ती कारवाई करून प्रशासनाची प्रतिमा मलीन करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी.