अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 8 डिसेंबर : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाटापांगरा येथील एका 31 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पाटापांगरा येथील सरपंच आरोपी त्रिशुल अंकुश नागोसे (वय 29) रा. पाटापांगरा विरुद्ध 354, 354 (A), 506 अंतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे पारवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
आरोपी त्रिशुल नागोसे याचे विरुद्ध Cr.P.C. 107 अंतर्गत सुद्धा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भादंवि 354 मध्ये 7 वर्षांच्या आत शिक्षा असल्याने आरोपीला नोटीस देऊन सोडुन देण्यात आले आहे, हे विशेष.
पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण लिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संदीप महाजन हे पुढील तपास करीत आहे.
पारवा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 31 वर्षीय पिडीत महिला ही बाहेर शौचालयास गेली असता, पाटापांगरा येथील सरपंच आरोपी त्रिशुल अंकुश नागोसे (वय 29) रा. पाटापांगरा याने मी गावचा सरपंच आहे. मी तुला शासनाकडून घरकुल मंजूर करुन देतो असे म्हणून वाईट उद्देशाने पिडीत महिलेकडे पाहुन तिची अचानक छाती दाबुन विनयभंग केला. तेव्हा, पिडीत महिलेने कल्ला केला असता, फिर्यादी पिडीत महिलेचे तोंड दाबुन तु जर कुणाला सांगितली तर तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली, अशा फिर्यादी महिलेच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी सरपंच त्रिशुल नागोसे विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पारवा पोलीस स्टेशनचे जमादार संदीप महाजन हे पुढील तपास करीत आहे.