अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 8 डिसेंबर : घाटंजी तालुक्यातील ताडसावळी येथील होणा-या निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी गुरुवारी आयता व कवठा (बु.) या गावातील शेतजमीनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच उप अधीक्षक भुमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना उमरी येथील गावातील व परिसरातील नागरिकांनी शेतजमिनीची मोजनी न करु देता हाकलून लावले. या वेळी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, निम्न पैनगंगा प्रकल्प धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रल्हाद गावंडे यांनी केले. या वेळी पारवा पोलीस स्टेशनचे जमादार अविनाश मुंडे, पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.