द प्रोफेशनल करियर बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांची संकल्पना..
अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला – महाराष्ट्रभर होणाऱ्या जिल्हा न्यायालय विविध पदांची पद भरती होत असून गरजू उमेदवारांसाठी एक महिन्याचे मोफत जिल्हा न्यायालय भरती चाळणी परीक्षा प्रशिक्षण घेण्यात येत आहे. बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना ऑनलाईन प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे.महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक श्रेणी (३)’ कनिष्ठ लिपिक, आणि शिपाई /हमाल अशा एकूण ५७९३ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था नेहमीच विद्यार्थी हिताच्या कार्यात सक्रियपणे अग्रेसर असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां करिता त्याचप्रमाणे सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी विशेषता जिल्हा न्यायालय लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई हमाल या पदांची भरती संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. तरी ज्या उमेदवारांनी जिल्हा न्यायालय भरती करिता अर्ज केला असेल.त्यांच्याकरिता एक महिन्यासाठी मोफत चाळणी परीक्षेचे मार्गदर्शन केले जाईल.
त्याकरिता उमेदवारांनी संस्थेकडे आपले नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.त्यानंतर शंभर उमेदवारांमध्ये बाकी उर्वरित उमेदवारांची निवड करण्यात येईल.अशी माहिती संस्थेचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांनी दिली.त्याकरिता उमेदवारांनी संस्थेकडे आपले नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.सदर प्रशिक्षण येत्या १५ डिसेंबर पासून सुरु होत आहे.
https://chat.whatsapp.com/DGneLSBqa8zFnqfWC7iPBp
आपण वरील लिंक वर जाऊन सुध्दा आपली थेट नोंदणी करू शकता.किंवा त्याकरिता संस्थेच्या कार्यालयीन नोंदणी संपर्क क्रमांक ८६६९७३६९९४,८८५५९९५७९२ यावर आपली नोंदणी करावी . तरी सर्व गरजु उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज पोहरे यांनी केले .