उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी,तळोदा
तळोदा: गुजरात राज्य परिवहन च्या बसच्या धडकेत मोटरसायकलवरील महिलेचा मृत्यू झाला असून मयतेचा पती जखमी झाल्याची घटना आज तळोदा येथे घडली या बाबत सविस्तर वृत्त असे की तळोदा येथील शनी गल्लीत राहणारे दांम्पत्य नामे अभिजित किसनसा कलाल वय-४९व सौ. अवंतीका अभिजित कलाल वय-४२ हे त्यांच्या मोटर सायकल ने नंदुरबार येथे दवाखान्याच्या कामासाठी जात असतांना त्यांच्या मिशन स्कुल मध्ये शिकणाऱ्या मुलीला भेटून बायपास मार्गे चिनोदा चौफुली कडे जात असतांना बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील बालाजी पेट्रोल पंपासमोर त्यांच्या मोटरसायकलला मागून येणाऱ्या गुजरात राज्य परिवहन अंकलेश्वर डेपोच्या बस क्र. जी जे18झेड8409 ने ओव्हरटेक करण्याचा नादात मागून धडक दिल्याने मोटरसायकल वरील सौ. अवंतिका कलाल ह्या मोटर सायकल वरून दूर फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली त्याचवेळी आजूबाजूचे लोक व इतर वाहनचालकानी त्यांना दवाखान्यात नेले मात्र गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नंदुरबार येथील दवाखान्यात नेत असतांना सौ अवंतिका यांचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला अभिजित कलाल यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. सौ अवंतिका यांच्या अकस्मात अपघाती मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत नंदुरबार शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास तळोदा पो.स्टे. चे पो नि राहुल पवार पो उ नि सागर गाडीलोहार करीत आहेत “बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग च्या तळोदा शहरातील बायपास वरील रोड च्या साईडपट्ट्या पूर्णपणे निकामी झाल्या असून त्यांच्या भरावाची मागणी स्थानिक नागरिकांनी आजच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर केली आहे”