अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव ता 8:-प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविदयालय मालेगाव च्या वतीने ता .9 ते 15 डिसेंबर या सात दिवशी दररोज दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत स्थानिक माहेश्वरी भवन लॉन जुने बस स्टॅन्ड येथे श्रीमद भगवत गीता ज्ञानयज्ञ साप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. वर्तमान परिस्थितीत भगवत गीता ज्ञानाची उपयुक्तता आणि प्रसंगीकता अगदी सहज पद्धतीने मांडणी प्रवचनकार ब्रह्माकुमारी भारती दिदी यांच्याकडून केली जाणार आहे. भारती दिदी मध्यप्रदेश राज्यातील कटनी येथिल ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचालिका असून त्यांनी आजच्या ताण तणाव व भ्रष्ट वातावरणात दुःखी, अप्रसन्न व निराश मनुष्याला मानसिक बळ आणि सकारात्मक जीवनशैलीचा पुरस्कार व अंगीकार करण्यासाठी व परिवारातील सदस्यांचे व सामाजिक स्तरावर निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान गितेच्या ज्ञानात समावलेले आहे ते ज्ञान सहज आणि सोप्या भाषेत मांडणी केली आहे.श्रीमद भगवत गीता ज्ञान यज्ञ साप्ताहाचे उदघाटन 9 डिसेंबर शनिवार च्या दुपारी 2 .00 वाजता संपन्न होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदी संचालिका ब्रह्माकुमारीज अकोला वाशीम, प्रमुख अतिथी म्हणून राजयोगिनी ब्रह्माकुमारी भारती दीदी, उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी भूवनेश्वरी,विशेष उपस्थिती म्हणून आमदार अमित झनक माजी आमदार विजयराव जाधव प स सभापती ,रंजनाताई काळे तहसीलदार दीपक पुंडे गटविकास अधिकारी,कैलास घुगे ,नगर पंचायत चे मुख्याधिकारी पंकज सोनूने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश उंडाळ,नायब तहसीलदारअर्चना घोळवे पत्रकार प्रा अरविंद गाभणे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.उदघाटन पूर्वी 9 डिसेंबर च्या सकाळी 8 वाजता मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत भारती दीदींच्या सन्मानार्थ कलश यात्रा काढण्यात येणार आहे.10डिसेंबर पासून पुढील सात दिवस सकाळी 6:30 ते 7:30 म्युझीकल एक्सरसाइज व 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत सुखमय जीवन जगण्यासाठी अध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी लक्ष्मी नारायण स्वयंवर चौथ्या दिवशी दुपारी 2 ते 5 या वेळेत कृष्ण सुदामा भेट,या घटनांचे नाटकीकरण करून सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रवचनकार यांनी भगवत गितेचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी अतिशय सहज आणि मनोरंजक पद्धती उपयोगात आणून दैनंदिन जीवनात सुखमय जीवन जगण्यासाठी भगवत गितेच्या ज्ञानाचा योग्य अर्थ समजून घेण्यासाठी हे सात दिवशीय ज्ञान सर्वसामान्य मनुष्यास लाभदायक ठरणार आहे.मालेगाव शहरात आशा प्रकारचा भगवत सप्ताह पहिल्यांदाच होतं आहे दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ब्रह्माकुमारी भारती दीदींची तारीख मिळाली आहे.तरी मालेगाव शहरासह तालुक्यातील सर्वांनी या श्रीमद भगवत गीता ज्ञान साप्ताहाला उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रह्माकुमारी स्नेहलता दीदी संचालिका ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र मालेगाव यांनी केले आहे.











