अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 8 डिसेंबर : ध्न्यानाचा अथांग महासागर 6 डिसेंबर रोजी मावळला. त्यामुळे सर्व जगात हा दिवस दु:खाचा दिवस असतो. या दिवशी प्रत्येक गावात खेड्या – पाड्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रध्दांजली वाहीली जात असते. येळाबारा गावात हाच श्रध्दांजली कार्यक्रम आगळा वेगळ्या पध्दतीने पार पडतो. सकाळी शाळेत पुस्तकांचे वाटप केल्या जाते. सायंकाळी 6.00 वाजता फुलांनी गुंफलेल्या डोलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून बुध्द वंदना घेतली जाते आणि रात्रभर भिमगितांचे भजन गायले जाते. आणि 7 तारखेला सकाळी 7.00 वाजता त्या फुलांनी गुंफलेल्या डोलीचे भजनातच नदीवर मेणबत्त्या लावून विसर्जन केल्या जाते. ही परंपरा गेल्या 40 वर्षापासून येळाबारा गावात चालु आहे आणि सर्व बौद्ध बांधव यावेळेस उपस्थित असते.