मारोती बारसागडे
तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी – नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत भव्य महिला शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ ३० वाजता नगर पंचायत समोरील प्रांगणात या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर , महिला बालकल्याण सभापती गीता सोरते ‘उपसभापती स्नेहा सातपुते ,नगरसेविका वर्षा भिवापूरे , रोशनी वरघंटे ,वंदना गेडाम , भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख ,भाजपा तालुका उपाध्यक्ष जयराम चलाख , प्रतीक राठी आदी मान्यवर उपस्थित होते .
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिलांना आरक्षण देण्याचा अभूतपूर्व कायदा करून व राज्यातील शिंदे, फडणवीस, पवार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने शक्ती कायद्याच्या माध्यमातून नारीशक्तीच्या रक्षणासाठी , कल्याणासाठी व विकासासाठी केंद्र व राज्यातील सरकार सातत्याने प्रयत्न करीत असुन सशक्तिकरण करण्याचा केलेला मोठा प्रयत्न व संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन हे खरोखरच अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्याच्या उद्घाटना प्रंसगी ते बोलत होते .
या कार्यक्रमादरम्यान नगरपंचायत चामोर्शी च्या वतीने वैयक्तिक स्वच्छालय ,घरकुल योजना , दिव्यांग महिला निधी ,स्वनिधी या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले .तर शासनाच्या विविध विकास योजनेची माहिती देणारे टल लावण्यात आले होते .यामध्ये महिला व बाल विकास विभाग चामोर्शी , संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना तहसील कार्यालय चामोर्शी , प्रधानमंत्री किसान सन्मान योजना भारतीय डाक विभाग चामोर्शी ,शासनाचे सोलर (सौर )अनुदानाबद्दल माहिती महावितरण कंपनीच्या चामोर्शी , प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव महाल , बँक ऑफ महाराष्ट्र , ग्रामीण रुग्णालय ,कामगार विभाग गडचिरोली आदी विभागाचे विविध योजनांचे टॅल महिला सशक्तिकरण अभियानाअंतर्गत लावण्यात आले होते .यावेळी विविध लाभार्थ्यांना या लाभाचे धनादेश प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .
सांस्कृतिक कार्यक्रमात जा. कृ . बोमनवार महाविद्यालय ,शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय ,के डी डी महाविद्यालय ,जिल्हा परिषद महाविद्यालय , जि.प .नूतन शाळा व नयना सिडाम व टीना गंदाटे यांनी महिला व बालविकास यावर नाटिका सादर केली तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जान्हवी विजय पेद्दीवार हिचा शाल, श्रीफळ ,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर ,संचालन प्रा . कल्पना बहिरेवार तर आभार प्रदर्शन लिपिक विजय पेद्दीवार यांनी पार पाडले .या कार्यक्रमासाठी नरारपंचायत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .महिलांची अफाट गर्दी झाली होती .
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)