प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.८ डिसेंबर पाथरीचे तरुण तडफदार नेतृत्व सईद खान. प्रदेशाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तालुक्यात जिल्हा परिषद ग्राउंड नगर परिषद समोर तालुका पाथरी येथे दि.१० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ०२-३० ते ०५-३० वाजता जॉब नियुक्तीपत्र, व जॉब कार्ड सायंकाळी ०५-३० ते ०६-३-वाजता वाटत होणार. अशी माहिती सईद भैय्या खान यांनी दिली. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ८०% समाजकारण २०% राजकारण यानुसार अल्पसंख्यांक व शिवसेनेच्या वतीने सईद खान यांच्या संकल्पनेतून पाथरी शहरात भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला आहे या महोत्सवात मोठमोठ्या नामांकित कंपन्या सुनील होणार आहेत. या नोकरी महोत्सवात तालुक्यातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन सईद खान यांनी केले आहे या महोत्सवात जॉब व जॉब कार्ड वाटप केल्या जाणार आहेत अशी माहिती शहीद खान यांनी दिली. आज अनेक तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहेत शिकून पण नोकरी लागत नाही नोकरीसाठी युवक युवतींना वन वन फिरावे लागत आहे. ही बाब जनसेवक शहीद खान यांच्या लक्षात येताच त्यांनी तालुक्यातील व जिल्ह्यातील युवक- युवतींना त्वरित जॉब मिळावा म्हणून हा भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला आहे या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मा. खासदार श्रीकांत जी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती सहित खान यांनी बोलताना दिली. युवक- युवतींनी आपले नाव नोंदणी. मुस्तफा भैय्या ९९२२५५५५९८ व मुशीर सय्यद ८२०८५७४२३५ या मोबाईल नंबर वर करावी असे आवाहन शहीद खान व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विविध खान मित्र मंडळ, व सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपापला जॉब मिळवावा असे आवाहन सईद खान यांच्या वतीने करण्यात आले आहे.


