सचिन डोळे :ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर:- सबसे कातील गौतमी पाटील सध्या तिच्या आगामी ‘घुंगरु’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार असून आता या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 100 चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब, माढा याचबरोबर उटी, म्हैसूर, वाघा बॉर्डर, राजस्थान, गोवा या ठिकाणी घुंगरू सिनेमाचे चित्रीकरण झालेले आहे. अशी माहिती हिंदवी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) श्री.रणजीत डोळे यांनी आज पत्रकारांना दिलीगौतमी पाटीलचा पहिला सिनेमा ‘घुंगरु’ हा सिनेमा आहे. तमाशा लोक कलावंत यांच्या जीवनाचे वास्तव मांडणारा ‘घुंगरु’ हा सिनेमा 15 डिसेंबर रोजी राज्यातील 100 स्क्रीनवर प्रदर्शित होणार असल्याचे या सिनेमाचे दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी सांगितले. आज पंढरपूर येथे ‘घुंगरु’ सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्च दरम्यान गौतमी उपस्थित नव्हतीलावणी प्रेम गीत आणि आयटम गीत अशी गाणी चित्रपटात असणार आहेत. देशातील सात राज्यात सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे . इतर भाषांतही हा चित्रपट डबिंग होणार असल्याचेही बाबा गायकवाड यांनी सांगितले
लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित घुंगरु गौतमीचा ‘घुंगरु’ हा सिनेमा लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. त्यामुळे गौतमीसाठी नक्कीच हा सिनेमा खूप खास असेल. या सिनेमात लव्हस्टोरीलोककलावंतांचं आयुष्य त्यांचा संघर्ष, रहस्य अशा सर्वच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. महत्त्वाचं म्हणजे बाबा गायकवाड यांनीच या सिनेमाची कथा, पटकथा लिहिली असून या भैय्या सिनेमाची निर्माते बाबा गायकवाड श्रीमंत ढाकणेअजितकेंद्रेसिनेमाचेनिर्मातेवहेत
गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्राला आपल्या नृत्य अदांनी घायाळ करणारी गौतमी आता अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. ‘घुंगरु’ या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच प्रशांत तोतला रंजीत जाधव श्रीमंत ढाकणे दत्तराज तोरणे सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते रोशनी कदम सानिका भगत तसेच बॉलीवूडचे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असुन या चित्रपटाचे छायांकन व संकलन सुपुत्र रवींद्र लोकरे यांनी केलेले आहे. या सिनेमाची गौतमीचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या चित्रपटाची ऑनलाईन तिकीट 12 डिसेंबर पासून उपलब्ध होणार आहेत .









