संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली.
तळेरे येथील स्व. सुनील तळेकर यांच्या 26 व्या स्मृती निमित्त स्मृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध मान्यवर, सुनील प्रेमी उपस्थित होते. स्व. सुनील तळेकर यांचा 26 वा स्मृतिदिन सोमवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते सुनील तळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक रमकांत वरूनकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उपाध्यक्ष राजू वळंजू, सचिव मिनेश तळेकर, विलास महाडिक, नितीन तळेकर, डॉ. अभिजित कणसे, ध्रुव बांदिवडेकर, शशांक तळेकर, हेमंत महाडिक, अशोक तळेकर, ग्रंथपाल संपदा तळेकर, संज्योत नांदलसकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना नितीन तळेकर म्हणाले की, सुनीलला अभिप्रेत असलेले काम त्याच्या पश्चात ट्रस्ट आणि वाचनालयाच्या माध्यमातून सुरू आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य अशा विविध क्षेत्रात विविध उपक्रम, स्पर्धा राबवून जास्तीत जास्त सेवा करण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी अनेकजण योगदान देत आहेत. तर शशांक तळेकर म्हणाले की, सुनीलच्या निधनानंतर प्रत्येकजण खारीचा वाटा उचलून ती चळवळ सुरू ठेवली आहे. ट्रस्ट आणि वाचनालयाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम मोठ्या प्रमाणात गेली 25 वर्षे आयोजित केले जात आहेत. या प्रत्येक उपक्रमातून सुनीलला अभिप्रेत असे कार्य सुरू आहे. असे सांगून अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक : शशांक तळेकर, स्वागत विनय पावसकर यांनी तर आभार विनय पावसकर यांनी केले.