समीर शेख
ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर
शेवगाव तालुक्यातील अमरापुर ग्रामपंचायत कार्यालय व अमरापुर बस स्टॅंड परिसर चौक या दोन्ही ठिकाणी आज दि.६ डिसेंबर २०२३ रोजी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिना निमित्त ग्रामपंचायत कार्यालय व बस स्टॅंड परिसर चौक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरां मुळेच लोकशाही नांदत आहे. वेगवेगळ्या जाती धर्माची लोक या देशात भारतीय राज्यघटनेमुळेच नांदत आहेत. आणि म्हणूनच भारत हा विविधतेतुन नटलेला देश म्हणून सर्व जगाला परिचित आहे ते फक्त संविधानामुळे शक्य झाले आपण सर्वांनी महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची मशाल तेवत ठेवली पाहिजे असे मत व्यक्त केले.यावेळी अमरापुर ग्रामपंचायत सरपंच सौ. आशाताई गरड,ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी उपस्थित होते यावेळी ज्ञानेश्वर म्हस्के,बाळासाहेब सुसे,बाळासाहेब चौधरी,दीपक क्षीरसागर,राम पोटफोड़े,रामनाथ मिसाळ,दादु म्हस्के,शैलेश म्हस्के,ताराचंद म्हस्के,देवीदास म्हस्के,संजय म्हस्के, अनिल म्हस्के,मायकल म्हस्के,नितिन कान्हू म्हस्के,संदिप उत्तम म्हस्के,नितिन सर्जेराव म्हस्के,अड्वोकेट हिरामन म्हस्के,मुस्तकीम कुरैशी,पोपट शेठ बाफना,काकासाहेब म्हस्के,सुनील म्हस्के,गोरख म्हस्के,आदिसह इतर भीमसैनिक व ग्रामस्थ मंडळी आणि भिमरत्न तरुण मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.