कैलास शेंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरद
बोरद: येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ०६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी इयत्ता पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित लघु चित्रपट देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. त्याचबरोबर शाळेचे प्राचार्य निलेश सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी देशाप्रती केलेले कार्य हे आपल्या शब्दांतून विशद केले. त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थी तसेच शिक्षकांनी देखील आपले मनोगत या ठिकाणी सादर केले. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक भटू पवार सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन हर्षल कलाल यांनी केले तर आभार संजय सोनार यांनी मानले.

