सोपान सासवडे
ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर.
लढायचे असेल तर शिकावच लागेल .ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावेच लागेल, पण त्यासाठी अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे. असे प्रतिपादन प्राध्यापक दादासाहेब ज्योतीक यांनी केले. चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.प्रसंगी अध्यक्षस्थाहून ते बोलत होते. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य अरुण वावरे, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, सर्जेराव निकाळजे, मंजाराम रासनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य अरुण वावरे म्हणाले की, कर्तव्याशिवाय माणूस घडूच शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखे महामानव कर्तव्यामुळेच घडले. फळाची अपेक्षा न करता आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत रहावे.कार्यक्रमाचे औचित्य साधून प्राचार्य अरुण वावरे सर यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित घटनेचा ग्रंथ भारताचे संविधान ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर कवळे यांचेकडे सुपूर्द केला.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सर्जेराव निकाळजे व मंजाराम रासनकर यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर बाबासाहेबआंबेडकरांचे जीवन जर एका शब्दात वर्णन करायचे असल्यास तो शब्द म्हणजे संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्तव्यनिष्ठता, नैतिकता, कठोर परिश्रम करून घेतलेले शिक्षण, चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, वर्णव्यवस्था इत्यादी बद्दल माहिती सविस्तर सांगितली. विद्यार्थ्यांमधून पुनम गोरे, श्रेया सरसे, सृष्टी भवर, डोंगरे भक्ति, गायत्री पातकळ, विद्या आठरे, ऋतुजा जाधव, प्रतीक्षा आंधळे, साक्षी कापसे, पुष्कर वावरे, स्नेहा केदार, उर्मिला भारस्कर, सिद्दी कापसे, श्रावणी बडे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर मराठे, तरन्नूम शेख प्रास्ताविक सुरेंद्र लोहकरे, भाऊसाहेब गायकवाड यांनी केले तर आभार संजय मरकड, तेजस्विनी पावसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले.









