जलील शेख
तालुका प्रतिनिधी,पाथरी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातुन सर्व भारतीय नागरीकांना अन्याया विरुध्द लढण्याचा हक्क दिला आणि कोणावर हि अन्याय होनार नाही याची काळजी ही घेतली आहे अशा या महामानवाचे थोर उपकार आपल्यावर आहेत असे मत पाथरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कराड यांनी पाथरी येथे अभिवादन कार्यक्रमप्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
पाथरी येथे भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुका अध्यक्ष टि.एम.शेळके यांच्या मार्गशनात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्ताने
दि.06/12/2023 रोजी सकाळी 10:30 वा. पाथरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर येथे बुध्द वंदना व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमा प्रसंगी प्रथम भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुका अध्यक्ष टि.एम.शेळके, सहायक पोलिस निरिक्षक कराड, बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे, बि.एन.वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे टि.डी.रुमाले, ता.अध्यक्ष शामराव ढवळे, आवडाजी ढवळे, संपादक विठ्ठल साळवे, माजी नगर सेवक लक्ष्मन कांबळे, युवा नेते दिलीप मोरे, डाॅ.बालासाहेब घोक्षे, माजी सरपंच जिजाभाऊ साळवे, सभापती सदाशिव थोरात, एल.आर.कदम, बि.एस.कांबळे, पत्रकार राजकुमार गायकवाड, भास्कर पंडित,पत्रकार लक्ष्मन उजगरे, सिध्दार्थ वाव्हळे, डाॅ.अधिकार घुगे, भास्कर साळवे, माजी न.प.स.अनिल ढवळे, संजय आण्णा ढवळे, प्रमोद ढवळे, लिंबाजी ढवळे, कसबे, श्रीरंग पंडीत आदींसह उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रस्तावीक संपादक विठ्ठल साळवे यांनी केले तर सुत्रसंचलन बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे यांनी केले शेवटी आभार वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शामराव ढवळे यांनी मानले तर टि.के.घुगे, शिवाजी पंडीत, विमलबाई ढवळे, बायनाबाई ढवळे,सोमित्राबाई ढवळे, पदमिनबाई ढवळे, रुकमिनबाई ढवळे, के.एम.फुलवरे, उत्तम मस्के, गौत्तम भदर्गे, सुनिता धनले, ठोकेताई, दुर्गावती वानखेडे आदिंचे अनमोल योगदान लाभले.या अभिवादन कार्यक्रमास पाथरी येथील आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्यने उपस्थित होते….


