अतिश वटाणे
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव ( बु ) येथे दि,४ डिसेंबर रोजी शहिद तंट्या मामा भिल्ल स्मृतिदिन व क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा जयंती संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपूर्ण महामानव यांच्या प्रतिमेची पूजा करून अभिवादन करण्यात आले होते. त्यानंतर ध्वजारोहण श्रीपाल धुळधुळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष. अतिरिक्त प्रभारी बिटरगाव ठाणेदार प्रेमकुमार केदार व वन्यजीव कार्यालय बिटरगाव आर. एफ. ओ. चंद्रशेखर भोजने साहेब हॆ होते. तर प्रमुख पाहुणे श्रीपाल धुळधुळे व बरडे हॆ होते. या कार्यक्रमाला गावातील संपूर्ण प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम महामानवांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. व तंट्या मामा भिल्ल ,बिरसा मुंडा यांच्या जीवनशैलीचा अर्थ काय होता आणि समाजाप्रती देशासाठी त्यांनी कोणकोणते कार्य केले हे समाज प्रबोधन पर भाषणाच्या माध्यमातून सांगत होते. व आपलेही कर्तव्य विसरायला नाही पाहिजे आपल्या समाजाच्या नवतरुण पिढीने शिक्षण घेतले पाहिजे. आपल्या समाजातही एकात्मता असली पाहिजे. कोणाचाही द्वेष न बाळगता सर्वांना सोबत घेऊन आपल्या मूलभूत अधिकारासाठी लढा दिला पाहिजे. असे समाज प्रबोधन पर भाषण गजानन कनाके यांनी अतिशय कणखरपणे करून समाज जागृतीचे आव्हान सुद्धा केले होते. त्यानंतर सायंकाळी तीन ते रात्री साडेनऊ पर्यंत तंट्या भिल्ल मामा व क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांचि शोभायात्रा संपूर्ण गावातून अतिशय शांततेत व समाज बांधवांच्या उल्हासात काढण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मा. जि. सैनिक उत्तम शिरगरे,तं. मु. अध्यक्ष मोहन कोंडेवाड, मा. तं. मु अध्यक्ष काशिनाथ पेंधे, सुरेश येमजलवार, सचिन साखरे, श्रावण गायकवाड, बापूजी तुपेकर, डॉ.सुरेश तिवारी, संभाजी नरवाडे, विनोद मामीरवार, शिवाजी हाके, व सर्व गावकरी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंता नरवाडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आयोजन राजूभाऊ पिटलेवाड व बिरसा मुंडा सामाजिक समिती बिटरगाव बु. च्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.