वसंता पोटफोडे
शहर प्रतिनिधी राळेगाव.
सन2022व 23या साला पासून सतत अतिवृष्टी व पुर नापिकी या नैसर्गिक संकटात शेतकरी सापडला असून शासनाने याची दखल घेतली नाही तसेच वारंवार या बाबीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाही याबाबत
शासनाने ताबडतोब
निर्णय घेऊन नुकसान भरपाई घोषित करुन संपूर्ण बाधीत शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत घोषित करावी तसेच कापसाला किमान १० ते १२ हजार रुपये सोयाबीनला ७ ते ८ हजार रुपये भाव देण्यात यावा व सरसकट विमा मंजुर करण्यात यावा
अशी मागणी राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाअसून निवेदन देताना दिलीप कन्नाके
ता. अध्यक्ष, गौतम तागडे सर तालुका- सरचिटणीस, प्रमोद- सुखदेव वनकर तालुका सचिव, प्रवीण भाऊ काकडे उपाध्यक्ष कमलदास तिरणकर अर्जुन काळे सुभाष येलेकार दिगाबर वडुळकार भास्कर परचाके सुधाकर ज्ञानेश्वर मोहदे गजानन सराटे तानबाजी चिंचोळकर विजय भोयर व असंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.


