सुधीर जाधव.
जिल्हा प्रतिनिधी, सातारा.
सातारा : उरमोडी पंचक्रोशीतील मुलांची शैक्षणिक प्रगती सुधारण्यासाठी तसेच त्यांची शहराकडे येण्यासाठी होणारी हेळसांड थांबवण्यासाठी त्यांना परळी येथेच महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने पुढाकार घ्यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य व श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे माजी विद्यार्थी राजू भोसले यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्याकडे कोल्हापूर येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात केली. यावेळी उद्योजक सुरेंद्र जैन, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे संस्थेचे सहसचिव( प्रशासन) डॉ.राजेंद्र शेजवळ, दैनिक लोकमतचे आवृत्तीप्रमुख दीपक शिंदे, विभागीय सदस्य गजानन बोबडे, प्रा. नागोजी बामणे परळी हायस्कूलचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष धनाजी पवार, डॉ. मुराद मुलानी, आनंदा गायकवाड,गिरीश कोठावळे, अमित राऊत परळीचे सरपंच बाळासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी राजू भोसले म्हणाले डॉ. प .पू. बापूजी साळुंखे यांनी 1959 परळी येथे संस्थेची उभारणी केली. त्यामुळे येथील मुलांना ज्ञानाची कवाडे मोकळी झाली.
परळी परिसरात सुमारे 50 ते 60 गावे येतात येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना परळीतच उच्च माध्यमिक शिक्षण तसेच वेगवेगळे कोर्स तसेच निवासी शाळा सुरू झाल्यास या परिसरातील वाड्या वस्त्यांमधील मुलांची शैक्षणिक परवडत थांबेल व त्यांची शिक्षणाची सोय होईल यासाठी परळी येथे उच्च माध्यमिक महाविद्यालय सेमी शाळा सुरू करण्याची मागणी संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे यांच्याकडे केली परळी शाखे मधील लिपिक शिक्षकवृंद क्लार्क अशी पदे भरावीत . याबरोबरच सातारा जावली तालुक्यातील शाळांकडेही प्रामुख्याने संस्थेने लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती होणार नाही याकडे संस्थेने अग्रक्रमाने पहावे. प्रा. अभय कुमार साळुंखे यांनीही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राजू भोसले यांचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला नेहमी सहकार्य असते त्यांनी सुचवलेली कामे तसेच त्यांनी केलेल्या मागणीला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करून परळी येथे लवकरात लवकर महाविद्यालय सुरू करण्याची कार्यवाही करू असे आश्वासन दिले. परळी येथील शाळेच्या इमारती बांधकामासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही प्रा. अभयकुमार साळुंखे यांनी दिली.यावेळी निलेश , सपकाळ ,यशवंत गंगावणे, नंदकिशोर पानसरे, रमेश बाबू, सुरेश हादगे शांतया जंगम, प्रवीण सुतार, आदी मान्यवर उपस्थित होते.


